जनहितार्थ आमच्या २४ तास मोफत उपलब्ध असलेल्या सेवा



रक्षाबंधन सोहळा - २०२५

सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी उन्नती सोशल फाउंडेशन आणि उन्नती सखी मंच यांच्या वतीने सफाई कामगार तसेच संस्थेच्या सदस्यांच्या सहभागातून रक्षाबंधनाचा पावन सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या प्रारंभी, संस्थापिका डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी सफाई कामगार भगिनींना व बांधवांना स्वतःहून राखी बांधून त्यांचा सन्मान केला आणि परस्पर बंधुत्व, कृतज्ञता व आपुलकीचा संदेश दिला. त्यानंतर उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांच्या सदस्यांनी एकमेकांना राखी बांधत एकात्मता, सौहार्द व सामाजिक ऐक्य यांचा संदेश दृढ केला. या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न (बाप्पू) काटे , पी.के इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक जगन्नाथ काटे, उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक श्री. संजय भिसे यांच्यासह, संस्थेचे सदस्यवर्ग, ज्येष्ठ नागरिक संघाचे मान्यवर सदस्य, विठाई वाचनाचे सदस्य, ऑल सीनियर सिटीजन असोसिएशन चे प्रतिनिधी, तसेच पिंपळे सौदागर – रहाटणी परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्किन केअर वर्कशॉप

उन्नती सखी मंच आणि प्युअर बीट स्किन केअर उत्पादने यांच्या वतीने , स्किन केअर वर्कशॉप (कार्यशाळा) आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी उन्नती सखी मंचच्या सर्व वयोगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्युअर बीटच्या संस्थापक सिमरन आर. पंजाबी यांनी उत्पादनाबद्दल आणि त्वचेच्या सर्वसाधारण काळजी संदर्भात महत्त्वाचे सल्ले उन्नती सखी मंचच्या उपस्थित सदस्य महिलांना दिले. अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने त्वचेची तपासणी करण्यात आली. प्रत्येक महिला सदस्याच्या त्वचेच्या गरजा नुसार दैनंदिन त्वचेची काळजी घ्या संदर्भातील सल्ला-मार्गदर्शन आणि समुपदेशन हे देखील उन्नती सखी मंचच्या सदस्यांना देण्यात आले.

श्रावणाचे रंग

उन्नती सखी मंच तर्फे आयोजित 'श्रावणाचे रंग' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 2025.

आमच्याशी संपर्क साधा

  जरवरी सोसायटी, पी.के. इंटरनॅशनल स्कूल समोर,
      पिंपळे सौदागर,
      पुणे, महाराष्ट्र, भारत

+91 91460 87777

info@unnatisocialfoundation.org

© 2025 Unnati Social Foundation All Rights Reserved | Designed & Developed by FourClaps - Digital Media Consultancy