रविवारी पहाटे पुणे शहरात एक आगळीवेगळी सामाजिक चळवळ अनुभवायला मिळाली, जेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशन , इस्कॉन बीसीईसी, विशाल नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रन टू फीड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. इस्कॉनच्या फूड फॉर लाईफ उपक्रमाअंतर्गत ही मॅरेथॉन भुकेच्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर - ११ मार्च २०२५, उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय , पिंपळे सौदागर, चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.
उन्नती सोशल फाउंडेशन व सिद्ध आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मधील सर्व मुलांसाठी - स्वर्ण बिंदू प्राशन संस्कार (सुवर्ण प्राशन ), वयोगट 0 ते 16 वर्षांपर्यंत, पुष्य नक्षत्र 16 एप्रिल 2024 रोजी , वेळ - सकाळी १०:०० ते ५:०० वाजेपर्यंत, उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे 200 रुपयाचा डोस 50 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उन्नती सोशल फाउंडेशन येथे जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी , संत तुकाराम गाथा यांचे विधिवत पूजन करून पुस्तक दिन साजरा करण्यात आला. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनावर आधारित पुस्तकांचे वाटप याप्रसंगी नागरिकांना करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी , संस्थापक संजय भिसे भूषण वायकर , मनोज शेजळ , मोहन राम , संतोष कोळवणे , अनिल कापसे , महेश गवस , संजय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्किंग वूमनसाठी एकप्रकारे देवदूत असणाऱ्या , कष्टकरी महिला आणि वर्किंग वूमन यांच्या भावबंधावर आधारित , "नाच ग घुमा" या चित्रपटाच्या प्रोमोशन साठी चित्रपटाचे कलाकार वृंद , दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासह अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, नम्रता संभेराव , शर्मिष्ठा राऊत तर , अभिनेते सारंग साठे , आणि प्रथमच निर्माता म्हणून पदार्पण करत असलेले स्वप्नील जोशी यांनी लोकमत पिंपरी विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन डॉ. कुंदाताई भिसे आणि संस्थापक श्री. संजय भिसे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे ,ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा करणाऱ्या स्वदेशी वाणाच्या , वड , पिंपळ , चिंच , कडुलिंब , औदुंबर , सुबाभळ या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच , या या रोपण केलेल्या वृक्षांची निगा देखील उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राखण्यात येणार आहे. याप्रसंगी , संस्थापक संजय भिसे , अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे , रमेश वाणी , बाळकृष्ण चौधरी , दिलीप चौगुले यांच्यासह विठाई वाचनालयाचे सदस्य , आनंद हास्य क्लबचे सदस्य आणि उन्नती सोशल फाउंडेशन चे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.होमीभाभा फाऊंडेशन , मुंबई यांच्यातर्फे इ.५ वी ते १० वी विद्यार्थ्यांना त्यांचे इंग्रजी आणि गणित या विषयातील कौशल्य वाढविण्यासाठी - (ग्रेट) सामान्य इंग्रजी चाचणी, (MSAT) गणित विज्ञान अभियोग्यता चाचणी. उन्नती सोशल फाऊंडेशन आणि डॉ.होमीभाभा फाऊंडेशन , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील पी.के.इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांच्या नावनोंदणी शुल्कात रु.१०० रुपयांची शैक्षणिक फी सवलत देण्यात येत आहे.
नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान
आवश्यक कागदपत्रे :
ओळखीचा पुरावा (कोणतेही एक) - आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन
रहिवासी पुरावा (कोणतेही एक) - आधार कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक, गॅस पावती बुक, ड्रायव्हिंग लायसन, भारतीय पासपोर्ट
एक पासपोर्ट साईज फोटो
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने , दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कला शिक्षक सुधीर लांडगे आणि भगवान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर मधील २५० हुन अधिक मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. सुप्रसिद्ध सिने अभिनेते दे धक्का फेम संजयजी खापरे यांची उपस्थिती या कार्यशाळेचे आकर्षण ठरली. संजयजी खापरे यांनी मुलांशी संवाद साधत , त्यांना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले.
उन्न'ती' चा गणपती महोत्सव - २०२४ अंतर्गत गणरायाच्या आरतीचा मान समाजातील दुर्लक्षित घटकांना प्राध्यानाने दिला जातो. याच अंतर्गत , गणरायाची आरती पिंपळे सौदागर मधील कर्तव्यावर असणाऱ्या सफाई महिला कामगार भगिनींच्या शुभहस्ते करण्यात आली.
उन्नती सोशल फाऊंडेशन , वेंसर हॉस्पिटल आणि ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिख धर्माचे संस्थापक , आद्य गुरू आणि मानवतावादी शिकवण देणारे संत गुरुनानक भगवान यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात उंची , वजन , ब्लड प्रेशर , ECG हृदयाचा आलेख , ब्लड शुगर , हाडांची घनता , नेत्ररोगतज्ञ यांच्या मार्फत नेत्रदोष तपासणी विनामूल्य करण्यात आली. तसेच , एक्स रे मध्ये ३० % सूट , पॅथॉलॉजी लॅब टेस्ट मध्ये २०% सूट , डेक्सा स्कॅन मध्ये २० % सूट देण्यात आली. पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. वेंसर हॉस्पिटल तर्फे डॉ.समीर पाटील (ऑर्थोपेडिक) , डॉ शरून शितोळे , डॉ.शैलेश तारू (व्यवस्थापक ), नितीन पंडित (व्यवस्थापक) या वैद्यकीय टीमने या शिबिरात सहभाग घेतला.
उन्न'ती' चा गणपती महोत्सव - २०२४ अंतर्गत इको फ्रेंडली गणेशा मोफत कार्यशाळा संपन्न
पीसीईटी इन्फिनिटी 90.4 या कम्युनिटी रेडिओ चॅनेलने शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना प्रसिद्धी प्रदान करण्यासाठी "आधी केलेची पाहिजे " हे सदर सुरू आहे. PCET Infinity 90.4 FM रेडिओ I उन्नती सोशल फाउंडेशनने आजवर केलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा
रोझलँड सोसायटी , पिंपळे सौदागर यांच्या वतीने दीपावली निमित्त सायकल डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. चंदन चौरसिया आणि धवल प्रजापती यांनी ज्येष्ठ नागरिक विजय मुळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सध्या वापरात नसलेल्या सायकल या माध्यमातून डोनेट करण्यात आल्या. या जमा झालेल्या सायकलच्या आवश्यक असलेल्या दुरुस्तीचा खर्चाला उन्नती सोशल फाउंडेशनने हातभार लावला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशन आणि सप्तर्षी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर मधील दिव्यांग बालकांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळखपत्र अभियान उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय येथे राबविण्यात आले. पूर्व नावनोंदणीने पिंपळे सौदागर येथील १०० दिव्यांग बालकांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग ओळखपत्र याद्वारे प्राप्त केले.
उन्नती सोशल फाउंडेशन व नंददीप आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर. शिबिरामध्ये खालील प्रमाणे तपासणी: रेटिना तपासणी, काचबिंदू तपासणी (IOP), मोतीबिंदू तपासणी, अंतिम स्पेक्ट पॉवर. डॉक्टरांचा सल्ला- समुपदेशन. ऑपरेशनची गरज असल्यास ऑपरेशनमध्ये उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे १० % सवलत देण्यात येईल.
सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी पिंपळे सौदागर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सन २०२५ चे स्वागत २०२५ रोप वाटप करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. तसेच , भारतीय स्त्री शिक्षणाचा अधिकार जागृत करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ०१ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या वर्धापनदिनाचे औचित्य देखील या रोप वाटपाला होते.
पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी यांच्या वतीने सायकल डोनेशन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. आज गरजू मुलांना या सायकलींचे वाटप करण्यात आले. चंदन चौरसिया आणि धवल प्रजापती यांनी ज्येष्ठ नागरिक विजय मुळकर यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सध्या वापरात नसलेल्या सायकल या माध्यमातून डोनेट करण्यात आल्या. या संपूर्ण जमा झालेल्या सायकलच्या आवश्यक असलेल्या दुरुस्तीचा खर्चाला उन्नती सोशल फाउंडेशनने हातभार लावला आहे.
5 लाखापर्यंत मोफत उपचार. 70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर. नाव नोंदणी व स्मार्ट कार्ड वाटप शिबिर
स्थळ :- उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय पी.के इंटरनॅशनल स्कूल समोर , पिंपळे सौदागर.
दिव्यांग बालकांना मोफत औषधोपचार दिले. आजपर्यंत शेकडो दिव्यांग मुलांना व बालकांना मोफत औषध उपचार केले. झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून संस्थेने २०२४ ला दिव्यांग बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे देखील आयोजन केले होते. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून १ डिसेंबर रोजी उन्नती फाउंडेशनने दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी म्हणजेच वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र यासंदर्भात शिबीर घेतले.
एकच लक्ष १०,००० वृक्ष उपक्रम गेली ६ वर्षपासुन राबवण्यात येत असून दरवर्षी नववर्षा स्वागत करत मोफत वृक्ष वाटप करण्यात येते. नववर्षाचे स्वागत वृक्षसंवर्धनाने करावे ही यामागील फाऊंडेशनची पर्यावरणपूरक भूमिका आहे. नागरिकांनी नववर्षाच्या स्वागताला एक नवीन झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे असा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.
दर वर्षी विविध दिनानिमित्त वर्षातून बऱ्याच वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते रक्तदान हे सर्वोत्तम दान समजले जाते. त्यामुळे दर वर्षी विविध औचित्याने, फाऊंडेशनचा रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा मानस असतो. पिंपरी चिंचवड शहरातील विविध रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत उन्नती सोशल फाउंडेशन विविध रक्तदान शिबिरे आयोजित करते.
पिंपळे सौदागर मधील नागरिकांसाठी मोफत वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांची वैचारिक वृद्धी व्हावी यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे विठाई वाचनालयाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात असून, २००० हून अधिक पुस्तकांचा वाचनालयात संग्रह आहे. नागरिकांकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचा स्वीकार देखील विठाई वाचनालयात करण्यात येतो. विठाई वाचनालय हे एकप्रकारे लोकचळवळ ठरत आहे.
पिंपळे सौदागर रहाटणी मधील नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा सुरु आहे. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी फाऊंडेशन मार्फत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली असून, गरजवंत रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती मध्ये, उन्नती सोशल फाऊंडेशनची रूग्णवाहिका सज्ज असते.
पिंपळे सौदागर रहाटणी मधील नागरिकांसाठी मोफत वैकुंठरथ सेवा सुरु आहे. आपल्या प्रियजणांना भावपूर्ण आणि सन्मान जनक निरोप देण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे, वैकुंठरथाची निर्मिती करण्यात आली असून, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची वैकुंठगमन मूर्ती त्यावर अंकित आहे.
पिंपळे सौदागर मध्ये गेल्या ५ वर्षांपासून मोफत पाणपोई सुविधा उपलब्ध करून आता पर्यंत १० पाणपोई सुरु आहेत. पिंपळे सौदागर येथे विविध १० ठिकाणी मोफत पाणपोई सुविधा फाऊंडेशन मार्फत उभारण्यात आली असून, या पाणपोई द्वारे शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेले, आर.ओ. आणि सुमधुर थंड पिण्याचे पाणी गेल्या ५ वर्षांपासून नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.
मोफत आधार स्मार्ट कार्ड व मतदार स्मार्ट कार्ड उन्नती सोशल फाउंडेशन मधून काढून देण्यात येते. नागरिकांच्या सोयीसाठी एक अंत्यत महत्वाचे डॉक्युमेंट असलेल्या आधार कार्ड व मतदार स्मार्ट कार्ड उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे मोफत काढून देण्यात येते. आजवर नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे दर वर्षी सामूहिक विवाह पार पाडण्यात येतो. गोरगरीब कुटुंबांसाठी विवाह ही तशी खर्चिक बाब! मात्र, उन्नती सोशल फाउंडेशन हीच बाब ध्यानात घेऊन दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा पार पाडते.
दर वर्षी उन्न "ती" चा गणपती महोत्सव साजरा करण्यात येतो त्यामध्ये ऐच्छिक दान पद्धतीने नागरिकांसाठी गणेश मुर्त्या उपलब्ध केल्या जातात व आरतीचा मान हा तृतीयपंथी,विधवा, अंध, सफाईकामगार महिला इत्यादी महिलाना दिला जातो.
पिंपळे सौदागर मध्ये सोसायटी व कॉलनी मध्ये जवळजवळ न १२५ मोफत सौर दिवे (सोलर पोल) फाउंडेशन तर्फे बसून देण्यात आले. अपारंपरिक आणि सौरऊर्जा चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत १२५ मोफत सौर दिवे बसविण्यात आले आहेत.
पाण्याची समस्या दूर करण्यासाठी , पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरामधील मधील सोसायट्यांमध्ये टँकर मुक्त सोसायट्या व्हाव्या त्यासाठी फाउंडेशन तर्फे आतापर्यंत ८० बोरवेल देण्यात आल्या.
पिंपळे सौदागर येथील नागरिकांसाठी दरवर्षी स्वरामृत दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आजवर हिंदी-मराठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमात सादर केली आहे.
पिंपळे सौदागर मधील नागरिकांसाठी मोफत फाउंडेशन तर्फे बसण्यासाठी बेंचेस देण्यात येतात. आज या बेंचेंसचा उपयोग अनेक रहिवासी सोसायटी मधील नागरिक विरुंगुळा तसेच गप्पा-गोष्टी करण्यासाठी करत आहेत.
पिंपळे सौदागर मधील नागरिकांसाठी दरवर्षी सहलीचे आयोजन करण्यात येते. सहल-पर्यटन हा नागरिकांच्या दृष्टीने अंत्यत जिव्हाळ्याचा विषय . हवापालट झाल्याने मन ताजेतवाने राहते. हीच बाब लक्षात घेऊन, दरवर्षी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांची सहल आयोजित केली जाते.
फाऊंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. नागरिकांचे आरोग्य हा पैलू देखील उन्नती सोशल फाउंडेशनने अग्रक्रमाने घेतला आहे. नागरिकांसाठी जनरल हेल्थ चेकअप, उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, थायरॉईड तपासणी शिबिर यांसारखी आरोग्य तपासणी शिबिरे फाऊंडेशन मार्फत वर्षभर राबविले जातात.
मोफत सुवर्णप्राशन व बालक वाढविकास तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. सुदृढ. समाज हा सुदृढ बालकांमुळेच निर्माण होतो. त्यामुळे दरवर्षी लहान बालकांसाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे, मोफत सुवर्णप्राशन व बालक वाढविकास तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते.
लहान मुलांच्या कालगुणांना वाव देण्यासाठी, उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच दक्ष आहे. शिवजयंती, नवरात्र आणि गणेशोत्सव या निमित्ताने दरवर्षी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
दर वर्षी विविध दिनानिमित्त वर्षातून बऱ्याच वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते रक्तदान हे सर्वोत्तम दान समजले जाते. त्यामुळे दर वर्षी विविध औचित्याने, फाऊंडेशनचा रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा मानस असतो. पिंपरी चिंचवड शहरातील विविध रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत उन्नती सोशल फाउंडेशन विविध रक्तदान शिबिरे आयोजित करते. शिवविचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी, दरवर्षी लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा आणि शिवचरित्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
लहान मुलांसाठी दरवर्षी गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, उन्नती सोशल फाऊंडेशन पुढाकार घेत असते. दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असते.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन येथे गुणवंत शालेय धावपट्टू प्रथमेश गणेश जाधव यांचा व यांचे पालक आई पल्लवी जाधव आणि वडील गणेश जाधव यांच्यासह सत्कार करण्यात आला.
दर वर्षी तिरंगा सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रा रॅली चे आयोजन करण्यात येते. दरवर्षी स्वातंत्र्यदिना निमित्ताने तिरंगा सन्मान यात्रा फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येते. सायकल राईड द्वारे प्रभातफेरी काढून, राष्ट्रचेतना जागृती करण्यात येते.
नवरात्री मध्ये नऊ रंगाचे महत्व अनुसरून कार्यक्रमांची आखणी करण्यात येते. नवरंगाप्रमाणे नऊ उपक्रम राबविण्यात येतात व भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
दरवर्षी बालदिनानिमित्ताने , बालजात्रेचे आयोजन करण्यात येते. बालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात येतात.
सांप्रदायिक चळवळीसाठी, उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच अग्रेसर आहे. भजन संस्कृतीला पुढे घेऊन जाण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
सर्वच थोर महापुरुषांच्या जयंत्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतात. प्रातिनिधीक स्वरुपात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासोबतच व्याखानाद्वारे महापुरुषांचे विचार पोहोचविण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन कटिबद्ध आहे.
उन्नती चषक 2024 बॅनरखाली एका भव्य उत्साहात, कुंदा ताईंच्या वाढदिवसानिमित्त एक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवडमधील मोफत चार्जिंग देणारा एकमेव पायलट प्रोजेक्ट उन्नती फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. कुंदा ताई भिसे यांनी सुरु केला.
इझी फिजिकल वर्कआउट्स, लाफ्टर योगा आणि प्राणायाम यासारखे उपक्रम रोज सकाळी आयोजित केले जातात.
उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत व्हीलचेअर, पाण्याची गादी, टॉयलेट सीट, वॉकर भाड्याने दिले जाते.
उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात जसे बचत गट, मुलींसाठी आरोग्य शिबीर, विमा पॉलिसी, मेहेंदी क्लास, इत्यादी.
उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन - तुमच्यातील धावण्याची आवड दाखवण्यासाठी एक प्रारंभिक शर्यत आयोजित करण्यात आली.
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चालवण्यात येते.
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेतील लहान मुला मुलींना खाऊ, चित्रकलेचे साहित्य, व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
जरवरी सोसायटी, पी.के. इंटरनॅशनल स्कूल समोर,
पिंपळे सौदागर,
पुणे, महाराष्ट्र, भारत
+91 91460 87777
info@unnatisocialfoundation.org